हार्दिक पांड्या – वय, व्यवसाय, लग्न, क्रिकेट माहिती. हार्दिक पांड्या हा भारतीय क्रिकेट संघाचा उपकप्तान आहे. तसेच तो सध्या सुरू असणाऱ्या IPL – इंडियन प्रिमियर लीग मध्ये गुजरात टायटन्स या संघाचा कप्तान आहे.
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव
हार्दिक हिमांशु पांड्या
जन्म
११ ऑक्टोबर १९९३
जन्मस्थळ
चोर्यासी , गुजरात
फलंदाजी
उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाज
उजव्या हाताने, मध्यम, जलद
शिक्षण
नववी
शाळा
एम के हायस्कूल, बडोदा
धर्म
हिंदू
वैयक्तिक माहिती
हार्दिक पांड्या चा जन्म गुजरात मधील सुरत येथे ११ ऑक्टोबर १९९३ साली झाला. त्याचे वडील हिमांशू पांड्या यांचा सुरत येथे ‘ Car Finance ‘ चा व्यवसाय होता. हार्दिक ५ वर्षांचा असतांनाच ते पूर्ण कुटुंबासोबत बडोद्याला राहायला गेले. आपल्या दोन्ही मुलांना बडोद्याला क्रिकेट चे चांगले शिक्षण मिळेल, याची त्यांना खात्री होती. वडोदरा येथील, किरण मोरे यांचा क्रिकेट अकॅडमी मध्ये त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नाव नोंदणी केली. पुढे हार्दिक पांड्या ने आपले शिक्षण नववी पर्यंतच पूर्ण केले, कारण त्याला क्रिकेट कडे पूर्ण लक्ष केंद्रित करायचे होते. हार्दिक पंड्या हा ‘ ऑल राउंडर’ खेळाडू आहे. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि राष्ट्रीय क्रिकेट विषयी माहिती पुढील प्रमाणे :