Ajinkya Raut Biography in Marathi Age, Birthday, Girlfriend / Wife, Family, Education, Serial, Movie. अजिंक्य राऊत म्हणजेच ‘सोनी मराठी’ या चॅनेल वरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी‘ या मालिकेमधील ‘राजवीर‘ हि प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता. या मालिकेमध्ये तो ‘जान्हवी तांबट’ या अभिनेत्री सोबत दिसणार आहे. हि मालिका आजच म्हणजे १७ जुलै २०२३ ला संध्याकाळी ७.३० वाजता आपल्या सर्वांचा भेटीला येणार आहे. चला तर मग, आता आपण ‘अजिंक्य राऊत’ म्हणजेच ‘राजवीर’ विषयी माहिती जाणून घेऊ या.
अजिंक्य चा जन्म १८ जानेवारी १९९३ ला परभणी येथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण परभणीतच झालं, त्या नंतर तो पुढील शिक्षणासाठी पुण्यामध्ये आला. लहानपणापासूनच अभिनयाची आणि मॉडेलिंग ची आवड असल्यामुळे, अजिंक्यने आपले उच्च – महाविद्यालयीन शिक्षण संपताच मॉडेलिंग चा करिअर कडे वळण्याचा निर्णय घेतला. अजिंक्यने ‘स्टार प्रवाह’ वरील २०१७ ला प्रदर्शित झालेल्या ‘विठू माउली’ या मालिकेमधून मराठी मालिकेचा जगात पदार्पण केले . या मालिकेमध्ये त्याने ‘विठ्ठलाची’ भूमिका साकारली आहे. त्यानंतर त्याने ‘झी मराठी’ वरील ‘मन उडू उडू झालं’ या २०२१-२०२२ साली प्रदर्शित झालेल्या मालिकेमध्ये ‘इंद्रा’ या मुख्य भूमिकेत अभिनय केला आहे.
अजिंक्य राऊत विषयी माहिती
नाव | अजिंक्य |
जन्म दिनांक | १८ जानेवारी १९९३ |
वय | ३० वर्ष (२०२३ मध्ये) |
गर्लफ्रेंड / बायको | – |
वडिलांचे नाव | – |
आई चे नाव | – |
वैवाहिक माहिती | अविवाहित |
गाव | परभणी (महाराष्ट्र) |
शिक्षण | इंजिनिअर |
अजिंक्य राऊत – करिअर विषयी
अजिंक्य ने ‘विठू माउली’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमधून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने सरी , कन्नी, आणि टकाटक २ या सिनेमा मधून हि अभिनय केलं आहे.
मालिका / सिनेमा | चॅनेल | भूमिकेचे नाव | वर्ष | |
विठू माउली | स्टार प्रवाह | मालिका | विठ्ठल | 2017 |
मन उडू उडू झालं | झी मराठी | मालिका | इंद्रा | 2021-2022 |
अबोल प्रीतीची अजब कहाणी | सोनी मराठी | मालिका | राजवीर | 2023 |
सरी | NA | सिनेमा | रोहित | 2023 |
कन्नी | NA | सिनेमा | NA | NA |
टकाटक २ | NA | सिनेमा | NA | 2022 |
अजिंक्य राऊत – सोशल मीडिया