Omkar Bhojane Biography in Marathi

Omkar Bhojane Biography in Marathi. ओमकार भोजने माहिती मराठी मध्ये -वय, व्यवसाय, लग्न सिनेमा, आणि बरच काही. ‘सोनी मराठी’ या वाहिनीवरील ‘महाराष्टाची हास्यजत्रा’ या विनोदी मालिकेमधून ओंकार भोजने घराघरात आणि प्रेक्षकांचा हृदयात पोहोचला. ओंकारचा जन्म १६ मार्च ला रत्नागिरी चिपळूण येथे झाला. त्याला पहिल्या पासून च अभिनयाची आवड होती. तो मूळचा जरी चिपळूण – रत्नागिरी येथील असला तरी त्याच महाविद्यालयीन शिक्षण ‘मुंबई विद्यापीठ’ येथून झालं आहे.

Image source - Instagram
Image source – Instagram

परिचय
नाव – ओंकार
जन्म ठिकाण -मुंबई, महाराष्ट्र
जन्मदिनांक – १६ मार्च
व्यवसाय – अभिनेता

Omkar Bhojane Career / Movies / Show

ओंकारने आज पर्यंत अनेक ठिकाणी अभिनय क्षेत्रात लहान – मोठे काम केलं आहे. पण २०१८ ला प्रदर्शित झालेल्या ‘बॉईज २’ या सिनेमामधून तो प्रकाश झोतात आला. खर तर ‘बॉईज २’ या सिनेमा मधून त्यांनी मराठी सिनेसृष्टीमधे पदार्पण केले. त्यानंतर त्याने ‘सरला – एक कोटी’ आणि ‘बॉईज – ३’ या सिनेमामधून काम केलं आहे. पण ओंकार भोजने हा ‘सोनी मराठी’ या वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी रिऍलिटी शो मुळे घराघरात पोहोचला आहे. या शो मध्ये त्याने आज पर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. कधी गंभीर, कधी भोळा, तर कधी विनोदी भूमिकेमधून त्याने नेहमीच आपल्या अभिनयाने सर्वाना खुश केलं आहे. मध्यंतरी ओंकार ला काही लोकांची टीका सहन करायला लागली होती. त्याच कारण असं होत कि त्याने त्याचा पहिला मुख्य भूमिका असलेला सिनेमा ‘सरला – एक कोटी’ प्रदर्शित होण्यापूर्वी ‘सोनी मराठी’ वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा विनोदी शो सोडला होता. या ‘शो’ मधून बाहेर पडल्या नंतर त्याने ‘झी मराठी’ वरील ‘फु बाई फु’ येथून आपल्या अभिनय कौशल्याने लोकांचे मनोरंजन केले. पण हा ‘शो’ महिन्याभरातच बंद करण्यात आला. सध्या ओंकार भोजने हा अष्टपैलू कलाकार परत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी शो मध्ये पुरागमन करणार आहे अशी चर्चा सर्व ठिकाणी रंगली आहे. व्यावसायिक नाटक – सध्या ओंकार भोजने महाराष्ट्रामध्ये बहुचर्चित नाटक ‘करून गेलो गाव’ मध्ये सुद्धा अभिनय करत आहे.

Onkar Bhojane Social Media

Instagram – https://www.instagram.com/onkar_bhojane_/

Shivani Naik Biography in Marathi – https://biographyinmarathi.in/index.php/2023/04/15/shivani-naik-biography-in-marathi/