सना शिंदे हे नाव सध्या बहुचर्चित आहे. त्याच प्रमुख कारण म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांचा भेटीला येत आहे.
Image source : Instagram
सना शिंदे हि मराठी दिगदर्शक केदार शिंदे यांची मुलगी. तुम्हाला आठवत असेल तर ‘अगं बाई, अरेच्या ‘ या सिनेमा मध्ये तिने बालकलाकार म्हणून काम केलं आहे. या सिनेमा मधील हिच ती चिमुरडी जी संजय नार्वेकरांना म्हणते , “काका मी तुम्हाला वेड म्हणाली, पण मनातल्या मनात तुम्हाला कस कळलं”? 🙂
आता हीच मुलगी केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमा मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमा मध्ये तिने ‘महाराष्ट्र शाहीर’ श्री. शाहीर साबळे यांची पत्नी भानुमती साबळे यांची भूमिका साकारली आहे. श्री. शाहीर साबळे हे सनाचे पणजोबा, तर भानुमती साबळे या तिचा पणजी आहेत.
Image source : Instagram
परिचय
नाव | सना शिंदे |
वडिलांचे नाव | केदार शिंदे |
आईचे नाव | बेला शिंदे |
जन्म | १८ ऑक्टोबर १९९८ |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, भारत |
शिक्षण | बॅचलर ऑफ मास मीडिया अँड मार्केटिंग |
महाविद्यालय | केळकर एज्युकेशन ट्रस्ट विनायक गणेश वझे कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स |
सना शिंदे हिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून ‘श्री विजयासाई प्रोडक्शन’ मुंबई महाराष्ट्र मध्ये ५ महिने काम केलं आहे.
सना इंस्टाग्राम वर सक्रिय असते, आता पर्यंत तिचे इंस्टाग्राम वर 13.6 k followers आहेत. https://www.instagram.com/sanashinde/