Sudha Murthy Biography in Marathi – Life, Education, Award. सुधा मूर्ती या एक प्रसिध्द भारतीय समाजसेविका, उत्तम लेखिका, शिक्षिका, अभियंत्या , आणि त्या ‘इन्फोसिस’ या प्रसिद्ध आय टी कंपनीचा अध्यक्षा आहेत. त्यांनी आज वर लहान मुलांसाठी अनेक पुस्तक लिहिली आहेत. तसेच सुधा मूर्ती या इन्फोसिस’ कंपनी चे सह-संस्थापक डॉ. श्री . नारायण मूर्ती यांचा पत्नी आहेत, आणि सध्याचे ब्रिटनचे पंतप्रधान श्री, ऋषी सुनक यांचा सासू आहेत. आपण सुधा मुर्तीं विषयी जाणून घेऊ या !!!!
बालपण – Early Life
सुधा मूर्ती यांचं जन्म १९ ऑगस्ट १९५० साली कर्नाटक मधील शिगंगाव येथे झाला. सुधा मूर्ती यांचं बालपण एक उच्चशिक्षित आणि ब्राह्म्ण घरात गेलं. त्यांचा वडिलांचं नाव श्री. रामचंद्र कुलकर्णी आणि आई च नाव विमल कुलकर्णी. त्यांचे वडील हे डॉक्टर – सर्जन होते. त्यांचं लहानपण त्यांचा आई – वडील आणि आजी – आजोबासोबत गेलं.
शिक्षण – Education
सुधा मूर्ती यांनी ‘बी.वी.बी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजि’ या कॉलेज मधून आपलं ‘इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स ‘मधून बी.ई च शिक्षण पूर्ण केलं. या वेळेस त्यांनी पूर्ण कॉलेज मधून प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना त्या वेळचे कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री. यांचा हस्ते सुवर्णपदक पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्या नंतर त्यांनी आपले कंम्पुटर सायन्स मधील पदव्युत्तर शिक्षण ‘इंडियन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स’ मधून पूर्ण केले.
कारकीर्द – Career
सुधा मूर्ती या ‘इन्फोसिस’ या कंपनीचा अध्यक्ष आहेत. तसेच त्या एक प्रसिध्द भारतीय कन्नड आणि इंग्रजी लेखिका आहेत. त्या एक समाज सेविका सुध्दा आहेत. त्यांनी नेहमीच ग्रामीण विकासासाठी नेहमी पुढाकार घेतला आहे. सुद्धा मूर्ती या स्वतः लेखिका असल्यामुळे त्यांना पुस्तकं बद्दल खूप प्रेम आहे त्यामुळेच ग्रंथालयांनी सुसज्ज करण्याच्या मोहिमेला नेहमीच पाठिंबा दिला आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या “भारतीय मूर्ती शास्त्रीय ग्रंथालय” ची स्थापना केली. त्यांनी कर्नाटकमधील बऱ्याच शाळांना संगणक सुविधा सुरु करून दिली. सुधा मूर्ती या टाटा ग्रुप मधील ‘टेलको ‘ या कंपनी मधील पहिल्या महिला अभियंता म्हणून नियुक्त झाल्या. त्यांनी पुणे , मुंबई आणि जमशेदपूर अशा वेगवेगळ्या ठिकणी काम केलं आहे. तसेच त्यांनी ‘वालचंद ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज’ पुणे येथे ‘सिनियर सिस्टिम अनॅलिस्ट ‘ म्हणून काम केलं आहे. सुधा मूर्ती या ‘बॅंगलोर युनिव्हर्सिटी’ आणि ‘क्रीस्ट युनिव्हर्सिटी’ मध्ये प्रॉफेसर म्हणून काम केलं आहे.
पुरस्कार – Award
१) दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांचा हस्ते सुधा मूर्ती यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आलं होत.
२) M.Techमध्ये सर्वोच्च रँकिंग प्राप्त केल्याबद्दल, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सने सुवर्ण पदक प्रदान केले.
३) B.E मध्ये सर्वोच्च ग्रेड प्राप्त केल्याबद्दल त्यावेळचे कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री देवराज उर्स यांच्याकडून सुवर्णपदक मिळाले.
४) कर्नाटकातील सर्व अभियांत्रिकी विद्यापीठांमध्ये सर्वोच्च SSLC स्कोअर मिळविल्याबद्दल, रोख पुरस्कार देण्यात आलं.
५) कर्नाटक विद्यापीठाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सीएस देसाई पुरस्कार प्राप्त झाला.
६) १९९५: रोटरी क्लब ऑफ बंगलोरचा सर्वोत्कृष्ट शिक्षक हा पुरस्कार देण्यात आला.
७) समाजातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडियाकडून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
८)सुधा मूर्ती यांचा तांत्रिक कन्नड पुस्तकासाठी पुरस्कार देण्यात आलं आहे. , “अत्तिमाबे” (शाले मक्कलगी संगणक – शालेय मुलांसाठी संगणक). ९)साहित्य आणि सामाजिक कार्यात काम केल्याबद्दल, कर्नाटक सरकार २००० साली “कर्नाटक राज्योत्सव” प्रदान केला.
१०)२००० साली पूर्ण झालेल्या उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल त्यांना २००१ मध्ये “ओजस्विनी” पुरस्कार मिळाला. ११) भारतात औपचारिक कायदेशीर शिक्षण आणि शिष्यवृत्ती वाढवण्याच्या सुधा मूर्ती यांचा कार्यासाठी, २०११ मध्ये ‘डॉक्टर ऑफ लॉ‘ पदवी मिळाली.
१२) सुधा मूर्ती आणि त्याचे पती नारायण मूर्ती यांना २०१३ मध्ये त्यांचा सामाजिक कामगिरी बद्दल बसवेश्वरा मेडिकल कॉलेज तर्फे “बसवश्री-२०१६” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१३) सुधा मूर्ती यांनी २०१८ मध्ये क्रॉसवर्ड-रेमंड बुक अवॉर्ड्सचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला .
१४) तसेच या वर्षी, म्हणजे २०२३ साली सुधा मूर्ती यांचा सामाजिक कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याचा हस्ते ‘पद्मभूषण‘ हा पुरस्कार देण्यात आला.
सुधा मूर्ती यांचे जीवनातील काही किस्से –
१) सुधा मूर्ती यांचे थेट JRD टाटा यांना पत्र –
सुधा मूर्ती या जेव्हा एम. टेक. करत होत्या , त्यावेळची गोष्ट. त्यांना त्यांचा कॉलेजचा नोटीस बोर्ड वर एक नोटीस दिसते. त्यामध्ये ‘टेलको – पुणे’ या टाटा ग्रुप चा कंपनी मध्ये अभियंता या जागेसाठी जॉब असल्याची माहिती असते. पण त्या नोटीसमध्ये ‘ महिलांनी अर्ज करू नये’ असं स्पष्ट लिहिलं होत. हे वाचून सुधा मूर्ती याना खूप राग आला. त्यांनी थेट JRD टाटा याना पत्र लिहायचं ठरवलं आणि त्यांनी तस केलं ही!!
या पत्राचा मजकूर असा होता कि, “सर, JRD टाटा, जेव्हा देशाला स्वातंत्र्य पण मिळाला नव्हतं तेव्हा तुम्ही केमिकल, स्टील, आणि इतर इंडस्ट्री चालू केल्या. तुम्ही नेहमी चा काळाचा पुढे आहेत. आपल्या समाजात ५०%-५०% पुरुष आणि महिला आहेत. आणि जर तुम्ही त्यामध्ये महिलांना नोकरीची संधी देत नाहीत तर हा समाज कधीच प्रगती करू शकत नाही. जर तुम्ही महिलांना योग्य शिक्षण आणि रोजगार देऊ शकत नाही, तर हे जग आणि समाज कधीच प्रगती करू शकत नाही. आणि हिच एक चूक तुमची कंपनी करत आहे”.
या गोष्टीचा परिणाम असा झाला कि, सुधा मूर्ती ना टेलको या कंपनी मधून मुलाखतीसाठी बोलवण्यात आलं. आणि त्यांची त्या नोकरी साठी निवड होऊन, सुधा मूर्थी या पहिल्या महिला अभियंता ठरल्या.
Instagram : https://www.instagram.com/sudha_murthy_official
1 thought on “Sudha Murthy Biography in Marathi – Life, Education, Award”
Comments are closed.