Devdatta Nage Biography in Marathi – Family, Movie, Tv Show, Serial. आज आपण ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमामधील श्री. हनुमान यांची भूमिका पार पडणारे देवदत्त नागे यांची माहिती- कुटुंब, सिनेमा, टीव्ही शो, मालिका आणि बरच काही जाणून घेऊ या.
वैयक्तिक आणि कुटुंब : देवदत्त यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९८१ ला अलिबाग येथे झाला. अलिबाग – महाराष्ट्र हेच त्यांचं गाव. त्यांचा पत्नी चे नाव कांचन नागे असून त्यांचे लग्न २०१० साली झालं. त्यांची पत्नी कांचन या शिक्षिका आहेत. देवदत्त – कांचन यांना एक मुलगा आहे, मुलाचं नाव- निहार नागे. देवदत्तनी केमिस्ट्री मधून पदवीच शिक्षण घेतलं आहे , तसेच ते १० वर्ष पॅरामेडिकल मध्ये काम करत होते.
नाव | देवदत्त नागे |
जन्म दिनांक | ५ फेब्रुवारी १९८१ |
जन्म ठिकाण | अलिबाग |
वडिलांचे नाव | गजानन नागे |
आईचे नाव | – |
विवाहित | हो |
पत्नीचे नाव | कांचन नागे |
मुलाचे नाव | निहार नागे |
शिक्षण | बी. एस्सी . (केमिस्ट्री) |
नोकरी | पॅरामेडिकल (१० वर्ष) |
कुटुंब, सिनेमा, टीव्ही शो, मालिका : देवदत्त नागे यांनी २०११ साली आपल्या अभिनयाचा क्षेत्रात सुरुवात केली २०११ मध्ये कलर्स टीव्ही वरील ‘वीर शिवाजी’ या मालिके मध्ये त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर कलर्स टीव्ही मधील “लागी तुझसे लगन” या मालिकेत सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती.
सिनेमा, टीव्ही शो, मालिका : देवदत्त नागे यांनी २०११ साली आपल्या अभिनयाचा क्षेत्रात सुरुवात केली २०११ मध्ये कलर्स टीव्ही वरील ‘वीर शिवाजी’ या मालिके मध्ये त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर कलर्स टीव्ही मधील लागी तुझसे लगन” या मालिकेत सुद्धा त्यांनी भूमिका साकारली होती. देवदत्त नागे यांना खरी प्रसिद्धी ‘झी मराठी’ वरील ‘जय मल्हार’या मालिकेमधून मिळाली. या मालिकेमध्ये देवदत्त हे ‘खंडोबा’ या प्रमुख भूमिकेत होते. तसेच त्यांनी स्टार प्रवाह वरील ‘देवयानी’ या मालिके मध्ये हि भैयाराव विखेपाटील यांची भूमिका साकारली होती. मृत्युंजय कर्नाची अमरगाथा, काले तस्मय नमः, बाजीराव मस्तानी अशा अन्य मराठी मालिकांमध्येही त्यांनी उत्तम अभिनय केला आहे. “एक माऊ चार भाऊ’ या व्यावसायिक नाटकामध्ये हि त्यांनी काम केलं आहे.
२०१३ साली त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दुबारा या सिनेमा मधून पदार्पण केलं, त्यानंतर २०१८ साली प्रदर्शित झालेला ‘सत्यमेव जयते’ या सिनेमा मध्ये हि त्यांनी अभिनय केलं आहे.
२०२० साली प्रदर्शित झालेला ‘ तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमा मध्ये त्यांनी सुभेदार तानाजी मालुसरे, यांचे धाकटे बंधू सूर्याजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित ‘आदिपुरुष’ या सिनेमा मध्ये श्री. हनुमान यांची भूमिका साकारत आहेत. तसेच २०१४ मध्ये ‘संघर्ष’ या मराठी सिनेमा मधून त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होत.
मालिका | वाहिनी | भूमिका |
वीर शिवाजी | कलर्स टीव्ही | सुभेदार तानाजी मालुसरे |
जय मल्हार | झी मराठी | खंडोबा |
देवयानी | स्टार प्रवाह | भैयाराव विखेपाटील |
लागी तुझसे लगन | कलर्स टीव्ही |
सिनेमा | |
वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दुबारा | २०१३ |
संघर्ष | २०१४ |
सत्यमेव जयते | २०१८ |
तानाजी : द अनसंग वॉरियर | २०२० |
आदिपुरुष | २०२३ |
सोशल मीडिया अकाउंट : Instagram – https://www.instagram.com/devdatta.g.nage/ Facebook – https://www.facebook.com/golddev