मालिशा खारवा बायोग्राफी मराठी – मालिशा खारवा वय, कुटुंब, शाळा, इंस्टाग्राम , फेसबुक, युट्युब. आज आपण मालिशा – स्लॅम प्रिन्सेस या एक १५ वर्षीय मुली विषयी माहिती सांगणार आहोत. मालिशा हि मुंबई येथील धारावी या ठिकाणी आपल्या कुटुंब सोबत राहते. सध्या तीच नाव खूप चर्चेत आहे. मालिशा हि वयाने लहान असली तरी तिचे स्वप्न खूप मोठे आहेत. सध्या ती सोशल मीडिया अकाउंट वर – स्लॅम प्रिन्सेस या नावाने प्रसिद्ध आहे.
Maleesha Kharwa – Age, Family
नाव | मालिशा |
जन्म दिनांक | १३ जानेवारी २००८ |
जन्म स्थळ | मुंबई, महाराष्ट्र |
वय | १५ वर्ष (२०२३ साली) |
लग्न | अविवाहित |
राष्ट्रीयत्व – | भारतीय |
वडिलांचे नाव | मुकेश खारवा |
आईचे नाव | |
भावाचे नाव | साहिल खारवा |
व्यवसाय | मॉडेलिंग / अभिनेत्री |
शिक्षण | १० वी (सध्या सुरु आहे) |
इंस्टाग्राम | https://www.instagram.com/maleeshakharwa |
फेसबुक | https://www.facebook.com/maleeshakharwa/ |
युट्युब | https://www.youtube.com/c/MaleeshaKharwa |
कारकीर्द
मालिशा सोशल मीडिया वर ‘स्लॅम प्रिन्सेस’ म्हणून प्रसिद्ध आहे. तिचे इंस्टाग्राम वर १२०k इतके फॉलवर्स आहेत. ती फक्त सोशल मीडिया वरच स्टार नाही, तर मालिशा सध्या ‘फॉरेस्ट इससेन्शिअल’ ची मुख्य ब्रँड अँबेसिडर सुद्धा आहे.
हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन २०२० मध्ये भारतात आला होता. त्याला भारतामध्ये एक व्हिडिओ अल्बम बनवायचे होते. पण २०२० मध्ये कोविड – १९ मुळे , सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे रॉबर्ट हॉफमन यांना बराच वेळ भारतामध्ये राहावं लागलं. या कालावधीतच रॉबर्ट हॉफमनची ओळख अचानक मालिशा सोबत झाली. मालिश ने आपल्याला पुढे जाऊन मॉडेलिंग मध्ये करिअर करायचे स्वप्न आहे असे सांगितले. एवढ्या लहान वयात मोठी स्वप्न पाहणाऱ्या मालिशा चे रॉबर्ट हॉफमन ला कौतुक वाटले. आणि इथून च मालिशाचा स्वप्नपूर्तीची सुरुवात झाली. मालिशा भारतातच नाही , तर आंतरराष्ट्रीयस्तरावर प्रसिद्ध आहे. ऑक्टोबर २०२० ला Shane आणि Falguni Peacock या प्रसिद्ध डिझायनरचा मॅगझीन प्रकाशित झाला होता. या मॅगझीनचा कव्हर पेज वर मालिशा चा मॉडेल म्हणून फोटो होता. हि तिचा करिअर ची सुरुवात होती, आणि त्यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही.